Food Safety : पुण्यातील हॉटेलमध्ये भाकरीत सापडला रबर बँड; सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

Published : Sep 07, 2026, 01:01 PM IST
Food Safety : पुण्यातील हॉटेलमध्ये भाकरीत सापडला रबर बँड; सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

सार

पुण्यातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला भाकरीत चक्क रबर बँड शिजलेला आढळला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई : गुरुग्राममध्ये सॅलडमध्ये अळी, ग्रेटर नोएडात KFC च्या चिकनमध्ये किडा आणि मुंबईत पेस्ट्रीच्या ट्रेवर फिरणारी झुरळं... हॉटेलमधील अस्वच्छतेच्या या घटना ताज्या असतानाच, आता पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनांमुळे भारतातील अन्न सुरक्षा आणि किचनमधील स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पुण्यातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला 'भाकरी'मध्ये 'रबर बँड' सापडल्याचं दिसतंय. व्हिडिओत ग्राहक भाकरी तोडतो, तेव्हा पिठासोबत 'शिजलेला' एक पिवळा रबर बँड आतून बाहेर येतो. हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी 'भारतात आता हे रोजचंच झालंय' असं म्हणत निराशा व्यक्त केली, तर काहींनी हॉटेलला जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणी केली.

अनेक युझर्सनी या ट्वीटमध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ला टॅग करत कडक नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. टाइम्स नाऊ या पोस्टमधील सत्यतेची आणि दाव्यांची पडताळणी करू शकलेलं नाही.

व्हायरल पोस्ट पाहा

“पूर्वी हॉटेलच्या जेवणात केस आणि माश्या सापडायच्या, पण आता रबर बँडचाही ट्रेंड आला आहे. पुण्यातील संदीप हॉटेलमध्ये भाकरीत रबर बँड दिला जातोय. बाहेर जेवताना तुम्ही काय खाताय, याची खात्री करा,” असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

ही पोस्ट ‘ravindraJourno’ या हँडलवरून X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

“कृपया भारतीय शाकाहारी जेवणावर टीका करू नका. भाकरीचा अपमान करणं देशविरोधी आहे, तो रबर बँड पिझ्झामध्ये टाकून पुन्हा व्हिडिओ बनवा. गंमत करतोय, पण हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि हॉटेलला जबाबदार धरले पाहिजे,” असं एका युझरने म्हटलं आहे.

“प्रश्न हा आहे की तो रबर बँड वितळला कसा नाही?” असा सवाल दुसऱ्या एका व्यक्तीने केला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

SSC परीक्षेत मोठा गैरप्रकार; विद्यार्थ्यांच्या जागी 10 ‘डमी’ उमेदवारांकडून पेपर
राष्ट्रीय क्रीडा दिनी अभय भुतडा फाउंडेशनचा पुढाकार; युवा खेळाडूंना स्पोर्ट्स किट्सचे वाटप