राष्ट्रीय क्रीडा दिनी अभय भुतडा फाउंडेशनचा पुढाकार; युवा खेळाडूंना स्पोर्ट्स किट्सचे वाटप

vivek panmand   | CMS
Published : Sep 03, 2026, 09:55 PM IST
abhay bhutada

सार

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत, अभय भुतडा फाउंडेशनने पुण्यातील ईश्वरपुरम वसतिगृहात राहणाऱ्या ईशान्य भारतातील गुणवंत विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप केले. संसाधनांच्या अभावामुळे कोणत्याही खेळाडूची प्रगती थांबू नये, या उद्देशाने फुटबॉल, क्रिकेट बॅट्स, आणि इतर आवश्यक साहित्य देऊन युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत सीए अभय भुतडा यांच्या नेतृत्वाखालील अभय भुतडा फाउंडेशनने पुण्यातील ईश्वरपुरम वसतिगृहात राहणाऱ्या ईशान्य भारतातील गुणवान विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप केले.

या उपक्रमांतर्गत युवा खेळाडूंना फुटबॉल, टेनिस रॅकेट्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल स्टड्स, क्रिकेट बॅट्स, बॅग्ज, पाण्याच्या बाटल्या तसेच क्रीडा साहित्य वाहून नेण्यासाठी विशेष कॅरिअर्स देण्यात आले. आर्थिक परिस्थिती, क्रीडा साहित्य किंवा आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूच्या प्रगतीला अडथळा येऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी अभय भुतडा यांनी सांगितले की, भारतात प्रतिभेची कमतरता नाही; मात्र अनेक युवा खेळाडूंना आपली क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी योग्य संधी आणि आवश्यक पाठबळ मिळत नाही. त्यामुळे फाउंडेशनच्या माध्यमातून अशा खेळाडूंना आवश्यक साधने आणि संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ईशान्य भारताने भारताला ऑलिम्पिक पदकविजेते तसेच फुटबॉल आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. या प्रतिभेला प्रोत्साहन देणे ही सामूहिक जबाबदारी असून युवा खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रवासात पुढे जाण्यासाठी आवश्यक साधने आणि प्रेरणा मिळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अभय भुतडा फाउंडेशन शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि आपत्तीच्या काळातील मदत अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात STEM शिक्षणासाठी किट्स, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच विविध क्रीडा स्पर्धांना फाउंडेशनकडून पाठबळ दिले जाते. पुण्यातील शिवसृष्टीसारख्या सांस्कृतिक उपक्रमांनाही फाउंडेशनने सहकार्य केले आहे.

२०२३ मध्ये स्थापन झालेल्या अभय भुतडा फाउंडेशनचा भर अल्पकालीन मदतीपेक्षा दीर्घकालीन आणि मोजता येणारा सामाजिक परिणाम निर्माण करण्यावर आहे. फाउंडेशन शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासह विविध सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Chhatrapati Sambhajinagar Crime : 'झाशीची राणी'चं... पेन्शनसाठी आजीबाई भिडल्या, चोरट्याला पळवून लावलं
Pune Crime : पुण्यात भरदिवसा थरार! तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं