
पुणे : पुणे येथील सर्वाधिक गर्दी आणि दाटीवाटी असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली होती. खरंतर, स्थानक गर्दीचे ठिकाण असूनही कोणालाही याबद्दल कळले कसे नाही असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला होता. याशिवाय घटनेच्या दिवशी स्थानकानात उपस्थितीत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले होते.
सदर घटना 25 फेब्रुवारी, 2025 रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली होती. यावेळी एका तरुणीवर दोनदा बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला दत्तात्रेय गाडे (Dattatraya Ramdas Gade) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अशातच आता पुणे कोर्टाने एक महत्वाचा निर्णय सुनावला आहे.
पुणे सत्र न्यायालयाने आरोपी दत्तात्रेय गाडे याचा जामीन फेटाळला आहे. सदर घटनेटा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी 893 पानी आरोपपत्र न्यायालयासमोर सादर केले.आरोपीने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाने हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा करत विविध न्यायनिवाड्यांचे दाखले सादर केले होते.
मात्र, विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी गाडेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. आरोपीने पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर जबरदस्ती केली असल्याचे स्पष्ट करत, आरोपीला जामीन दिल्यास पीडितेच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या युक्तिवादाचा स्वीकार करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला नकार दिला. तपासात समोर आलेल्या महत्त्वाच्या आणि निर्णायक पुराव्यांमध्ये विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय, लोकेशन ट्रेसेस आदींचा समावेश आहे. या सर्व पुराव्यांवरून आरोपी व पीडिता यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क किंवा आर्थिक व्यवहार नव्हता, हे स्पष्ट झाले आहे.
पीडितेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत, पीडितेच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आरोपी गाडे याचा मुक्काम येरवडा कारागृहातच कायम राहणार आहे.
नक्की काय घडले?
पीडित तरुणी मंगळवारी (25 फेब्रुवारी) सकाळी 5.45 मिनिटांनी फलटण, साताऱ्यासाठी जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. त्यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे येत तिला ताई म्हणाला. या व्यक्तीने साताऱ्यासाठीची बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली असल्याचे म्हटले. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला शिवशाही एसी बसमध्ये नेले. बसमधील लाईट्स बंद होत्या. पीडित तरुणी बसमध्ये चढण्यास घाबरत होती तरीही आरोपीने तिला चढण्यास सांगितले आणि त्याचवेळी बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
कोण आहे दत्तात्रेय गाडे?
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.