
महाराष्ट्रात अपहरण, बलात्कार, चोरी आणि गुंडागिरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळं महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होताना आपल्याला दिसून येत आहे. वर्ध्यातील मुख्य बाजारपेठेत एका तरुणाने परिचारिकेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
आरोपी व्यक्तीने परिचारिकेवर हल्ला केल्याचं आजूबाजूला असलेल्या जमावाच्या लक्षात आलं. त्यानंतर तो जमाव आरोपीच्या मागे हात धुवून लागला, अशावेळी आपली यांच्या ताब्यातून सुटका होणार नाही हे आरोपीच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं जवळच असलेल्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरणागती पत्करली. त्यामुळे त्याचा संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका झाली.
तरुणाने परिचारिका असणाऱ्या मुलीवर सपासप वार केले. सौरभ रवींद्र क्षीरसागर हा मुलीला भेटायला आला होता. या तरुणाने तिच्याशी संवाद साधत असताना जवळ असलेलं कट्यार काढले आणि सपासप वार केले. यावेळी संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर संतप्त जवानाने सौरभचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण त्यानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला अटक करून घेतली.