पुणे येथे फूटपाथवर झोपलेल्या काही जणांना एका डंपरने चिरडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जातेय.
Pune Accident : पुणे येथे फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांचा चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन लहान मुलं आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना वाघोली येथील केसनंद फाटाजवळील पोलीस स्थानकासमोर रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी घडली, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
फूटपाथवर झोपलेले सर्वजण मजूर होते. हे सर्वजण रविवारी (22 डिसेंबर) रात्री कामाच्या कारणास्तव अमरावती येथून आले होते. रात्रीच्या वेळेस एकूण 12 जण झोपले होते. अन्य काहीजण फूटपाथच्या कडेला असणाऱ्या एका झोपडीत झोपले होते. याचवेळी अचनाक अवजड सामान असणारा डंपर फूटपाथवर चढला गेला आणि झोपलेल्यांना त्याने चिरडले.
सदर दुर्घटनेनंतर आक्रोश झाला असता नागरिक पीडितांचा बचाव करण्यासाठी धावले. यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दारुच्या नशेत असणाऱ्या डंपर चालकाला अटक करण्यात आले आहे. चालकाच्या विरोधात मोटर व्हिकल्स अॅक्ट (MVA) आणि भारतीय न्याय संहिता (BNS)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांमध्ये विशाल विनोद पवार (22 वर्षे), वैभवी रितेश पवार (1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (2 वर्ष) तर
आणखी वाचा :
बीडमध्ये 'सिंघम'ची एंट्री, नवनीत कॉवत कायदा & सुव्यवस्था सुधारणार का?
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांड: शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश