वाढती गुन्हेगारी, दहशत आणि अराजकता. बीड जिल्हा आता राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर! विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी एकच आवाज उठवला आहे. "बीड बिहार बनलंय का?"
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या. यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर आली. ही घटना राज्यभर गाजली आणि तणाव वाढला.
घटना उलगडताच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित निर्णय घेतला आणि पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली. त्याऐवजी, नविन पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती केली.
बीड जिल्ह्यातील खंडणी पॅटर्न, पीक विमा घोटाळा, आणि गावगुंड पॅटर्न यामुळे राज्य आणि देशभर चर्चेत येत आहे. यामुळे पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं.
संतोष देशमुख हत्येतील काही आरोपी अजूनही फरार आहेत. काहींना पोलीसच अभय देत असल्याचे आरोप उचलले जात आहेत.
नवनीत कॉवत हे 2017 च्या IPS बॅचचे अधिकारी. राजस्थानमधून आलेले कॉवत यांनी आयआयटीमधून बीटेक केले. पण पोलीस सेवेसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली.
कॉवत हे छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम करत होते. ते कठोर निर्णय घेण्याच्या त्यांच्या शैलीसाठी ओळखले जातात.आता ते बीडचे नवे पोलीस अधीक्षक आहेत.
नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वात बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे नवा अध्याय सुरू होईल का? सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.
कॉवत यांचा प्रवेश बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अराजकतेचा सामना करण्यासाठी एक नवा आशावाद निर्माण करतो. बीडची कायदा व्यवस्था पुन्हा मजबूत होईल का?