"माझं आयुष्य आता काही कामाचं नाही...", 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या; सुसाईड ऑडिओतून आईला शेवटचा संदेश

Published : Jun 23, 2025, 09:56 AM ISTUpdated : Jun 23, 2025, 10:02 AM IST
Pune Suicide

सार

पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खरंतर, नैराश्यातून तरुणाने आयुष्य संपवल्याचे सांगितले जात आहे. 

Maharashtra : पिंपरी-चिंचवड परिसरातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ १८ वर्षांच्या संजयकुमार विनोदकुमार राजपूत या युवकाने नैराश्याच्या भरात विष प्राशन करून आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने आईला एक सुसाईड ऑडिओ पाठवून आपली अखेरची भावना व्यक्त केली. या क्लिपमध्ये तो म्हणतो, “मम्मी मी मोबाईल फोडून टाकतो. पुन्हा उचलणार नाही. मला मरायचं आहे... मी विष प्यायलं आहे. मी लोकेशन पाठवलं आहे. माझा मृतदेह घेऊन जा...”

१७ जून रोजी संजयकुमार बेपत्ता झाल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर शनिवारी त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला. त्याच्या जवळच विषारी औषधाची बाटलीही सापडली. शवविच्छेदन अहवालानुसार, विष प्राशन करून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

संजयकुमार आपल्या कुटुंबासह पिंपरी-चिंचवडमध्ये राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन लहान बहिणी आहेत. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्याने भावनिक शब्दांत आपल्या बहिणींबद्दलची काळजी व्यक्त केली. तो म्हणतो, “माझ्या आई-वडिलांना एवढंच सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला काही नकोय... फक्त माझ्या बहिणींची चिंता आहे. त्यांचं पालनपोषण नीट व्हायला हवं. सुशिक्षित होऊन पुढे गेल्या पाहिजेत. माझं आयुष्य आता काही कामाचं नाही.”

पोलिस तपासात समोर आले की, संजयकुमार नैराश्यात होता आणि त्याने ऑनलाइन विषारी औषध मागवून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन क्लिप्स पोलिसांना मिळाल्या असून, त्या त्याच्या मनस्थितीचे प्रतिबिंब दाखवतात. सध्या देहूरोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इमारतीच्या 21 व्या मजल्यावरुन उडी

जून महिन्यातच पुण्यातील क्राउन ग्रीन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरुन उडी मारत 25 वर्षीय आयमी व्यावसायिक महिलेने आत्महत्या केली होती. याशिवाय एक सुसाइट नोट लिहून त्यामध्ये महिलेने तिच्या आई-वडीलांसह मित्रांची या टोकाच्या भूमिकेबद्दल माफी मागितली होती. नोटमध्ये मी जगणे संपवले असून आता मला जगायचे नाही असे लिहिले होते.

सासूच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य

सासूकडून सातत्याने हुंड्यामुळे करण्यात येणाऱ्या छळाला कंटाळून 29 वर्षीय उच्चशिक्षित महिलेने आयुष्य संपवल्याची घटना पुण्यात घडली. दीपिका प्रमोद जाधव असे महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर दीपिकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे घडली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर