Published : Jan 12, 2024, 08:07 PM ISTUpdated : Jan 12, 2024, 08:20 PM IST
PM Narendra Modi Visits Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव आणि मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी (12 जानेवारी 2024) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव आणि मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी (12 जानेवारी 2024) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी राज्यात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रशासकीय अधिकारी देखील यावेळेस उपस्थित उपस्थित होते.
29
पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये रोड शो केला आणि श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा देखील केली.
39
रोड शोमध्ये पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे देखील सहभागी झाले होते.
49
नाशिककरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले.
59
पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नाशिकरांमध्ये मोठा उत्साह यावेळेस पाहायला मिळाला.
69
स्थानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फुलांचा वर्षाव केला.
79
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी नदीचे गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधिवत पूजा तसेच आरती केली. यावेळी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना चांदीचा अमृत कलश, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
89
नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात (Kalaram Temple) पंतप्रधान मोदींनी पूजा केली तसेच रामकुंड येथे झालेल्या पूजेमध्येही ते सहभागी झाले होते.
99
संत एकनाथ यांनी मराठी भाषेत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील श्लोकही त्यांनी यावेळेस ऐकले.
स्वामी विवेकानंद यांची जयंती
नाशिकमधील श्री काळाराम मंदिर परिसरातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.