नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर लोक पुन्हा आपापल्या घरी येतील, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. म्हणून पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनीही सतर्क राहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचवल्या जातील, अशा महत्त्वाच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आली आहे. यानुसार टास्क फोर्सची पहिली बैठक गुरुवारी (28 डिसेंबर 2023) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली.