सोनोग्राफी करण्यासाठी पोहोचली गर्भवती महिला, रिपोर्ट पाहून डॉक्टरांची उडाली झोप

Published : Jan 31, 2025, 10:53 AM ISTUpdated : Jan 31, 2025, 10:54 AM IST
what pregnant women should not do during surya grahan

सार

महाराष्ट्रातील एका गर्भवती महिलेच्या भ्रुणामध्ये अजून एक भ्रूण असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खरंतर, सोनोग्राफी करण्यासाठी पोहोचलेल्या महिलेनेचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

Maharashtra : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील एक दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. येथील गर्भवती महिला रुग्णालयात तपासासाठी गेली असता तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्याही पोटात भ्रूण असल्याचे समोर आले आहे. या गर्भावस्थेला वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फीटू’ असे म्हटले आहे. फिटस इन फिटू एक दुर्मिळ स्थिती असून त्यामध्ये एक विकृत भ्रूण दुसऱ्या भ्रूणमध्ये असते. हे प्रकरण अशावेळी समोर आले जेव्हा तीन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णालयात एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली होती.

बाळाच्या पोटात भ्रुण

डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केली असता बाळाच्या पोटात भ्रूण असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे डॉक्टरांकडून कोणताही हलगर्जीपणा न करता महिलेची प्रसूती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णालयातील प्रसूती आणि स्री रोग विशेतज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी म्हटले की, भ्रूणमध्ये भ्रूण असणे एक दुर्मिळ प्रकरण आहे. ही स्थिती पाच लाखांमध्ये एकामध्येच आढळून येते.

 

 

जगात केवळ 200 प्रकरणे

डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी म्हटले की, संपूर्ण जगभरात अशाप्रकारची केवळ 200 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी भारतातील 10-15 प्रकरणे आहेत. डॉक्टरांनी पुढे म्हटले की, मी या भ्रुणामध्ये काही असमान्य गोष्टी पाहिल्या. खरंतर, बाळ 35 आठवड्यांचे आहे. ही स्थिती पाहून सुरुवातीला धक्का बसला. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी माहिती देत म्हटले की, महिलेची सुरक्षित प्रसूती होण्यासाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी तिला छत्रपती संभाजीनगरमधील एका वैद्यकिय केंद्रात पाठवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

गुइलेन बॅरे सिंड्रोमचा महाराष्ट्रात पहिला बळी, पुण्यातील रुग्णांचा आकडा 101 वर

नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, किवळा परिसर हाय अलर्ट झोन घोषित

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती