गुइलेन बॅरे सिंड्रोमचा महाराष्ट्रात पहिला बळी, पुण्यातील रुग्णांचा आकडा 101 वर

Published : Jan 27, 2025, 08:28 AM IST
Guillain Barre Syndrome

सार

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. या आजाराचा रविवारपर्यंत (26 जानेवारी) एकूण रुग्णांचा आकडा 101 वर पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय व्हेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.

Pune Guillain Barre Syndrome : पुणे आणि आसपासच्या शहरात पसरलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे एका व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, मृत व्यक्ती पेशाने चार्टर्ड अकाउंटेट होता. आरोग्य विभागाने म्हटले आहे, आणखी 8 जणांना गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. जीबीएस रुग्णाचा मृत्यू सोलापूरातील असल्याचेही सांगण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, या आजाराने ग्रस्त असणारे 16 रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. याशिवाय जीबीएसची लक्षणे दिसून आलेले 19 जण 9 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 50-80 वयोगटातील 23 रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाचा नागरिकांना सल्ला

आरोग्य विभागाला 9 जानेवारीला पुण्यातील रुग्णालयात भरती झालेल्या एका रुग्णांवर जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याचा संशय आला होता. यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या काही नमून्यांमध्येकॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया फैलावल्याचे कळले गेले.

25 जानेवारीला प्रशासनाने केलेल्या परिक्षणाच्या माध्यमातून असे समोर आले होते की, पुण्यातील पाण्याचा मुख्य स्रोत खडकवासला धरणाजवळील एका विहीरीत बॅक्टेरिया ई कोली उच्च प्रमाणात झाले आहेत. पण अधिकाऱ्यांनी अद्याप विहिरीचा वापर केला जात होता की नाही हे स्पष्ट सांगितलेले नाही. यामुळे नागरिकांना पाणी उकळवून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जीबीएसच्या लक्षणांसाठी सर्वेक्षण

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, रविवारपर्यंत 25,578 घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. आमचा उद्देश अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा आहे. जीबीएसवरील उपचार अतिशय महागडे आहे. प्रत्येक इंजेक्शनची किंमत 20 हजार रुपये आहे.

80 टक्के रुग्ण 6 महिन्यांपर्यंत होतात बरे

डॉक्टरांनी म्हटले आहे की, 80 टक्के प्रभावित रुग्ण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या सहा महिन्यांमध्ये कोणत्याही मदतीशिवाय चालू शकतात. पण काहींना संपूर्ण शरिरातील अवयवांचा कामांसाठी वापर करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो.

आणखी वाचा : 

नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, किवळा परिसर हाय अलर्ट झोन घोषित

गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पुण्यात हाहाकार

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती