PMAY Scheme In Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पंतप्रधान आवास योजनेच्या (PMAY) दुसऱ्या टप्प्यात 6,550 स्वस्त घरे उभारणार आहे. शहरातील मामुर्डी, पुनावळे, वाकडसह नऊ ठिकाणी हे गृहप्रकल्प राबवले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये 6,550 कुटुंबांना मिळणार हक्काचं घर
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याचं स्वप्न आता अनेकांसाठी वास्तवात उतरणार आहे. शहरातील वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकांना स्वतःचं घर घेणं कठीण झालं असतानाच, आता पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत 6,550 स्वस्त घरे उभारण्याचा महापालिकेचा मेगा प्लॅन जाहीर झाला आहे.
27
नऊ ठिकाणी नवे गृहप्रकल्प
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. या टप्प्यात मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत आणि चोविसावाडी अशा नऊ ठिकाणी नव्या गृहसंकुलांची उभारणी होणार आहे. या प्रकल्पांसाठी जागा आधीच सुधारित विकास आराखड्यात (डीपी) आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
37
पहिल्या टप्प्यात हजारो कुटुंबांना लाभ
महापालिकेने यापूर्वीच शहरातील काही भागांत प्रकल्प पूर्ण केले आहेत.
मोशीतील बोहाडेवाडी
चिखलीतील चऱ्होली
पिंपरीतील उद्यमनगर
आणि आकुर्डीतील मोहननगर येथे एकूण 3,668 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) देण्यात आल्या आहेत. तर डुडुळगाव येथे सध्या 1,190 सदनिकांचे बांधकाम सुरू आहे.
शहरातील रावेत, ताथवडे आणि चोविसावाडी या ठिकाणी बेघर (HDH गट) नागरिकांसाठी स्वतंत्र गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत. रावेत परिसरात एक जुना आणि एक नवा असे दोन प्रकल्प राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
57
पूर्णतेसाठी लागणार 3 ते 5 वर्षे
या सर्व नऊ प्रकल्पांतून सुमारे 6,550 सदनिका तयार होतील. त्यांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो कुटुंबांचे ‘स्वतःच्या घराचे’ स्वप्न पूर्ण होणार आहे.
67
थोडक्यात महत्वाची माहिती
एकूण सदनिका: 6,550
योजना: पंतप्रधान आवास योजना (PMAY)
नवे प्रकल्प: 9 ठिकाणी
पहिला टप्पा पूर्ण, दुसरा टप्पा सुरूवातीच्या टप्प्यात
लाभार्थी: EWS आणि बेघर नागरिक गट
77
हजारो कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत हक्काचं पक्कं घर मिळणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या गृहनिर्माण प्रकल्पामुळे शहरातील हजारो कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत हक्काचं पक्कं घर मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. शहरातील वाढत्या घरांच्या भावावर उपाय ठरणारी ही योजना अनेकांसाठी नवी सुरुवात घेऊन येत आहे.