Maharashtra Weather Alert: नोव्हेंबरच्या पावसानंतर महाराष्ट्रात थंडीचे जोरदार आगमन झाले असून उत्तर महाराष्ट्रात पारा 10°C पर्यंत घसरला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तापमानात घट झाली असून, हवामान विभागाने आगामी दिवसांत थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सततच्या पावसानंतर महाराष्ट्रात थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी भासत असून, मराठवाडा आणि विदर्भातही तापमानात घट पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरसाठी राज्यभरातील हवामान परिस्थिती पाहूया.
27
मुंबई आणि कोकण
मुंबई शहर व उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहणार आहे. कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 22°C राहण्याची शक्यता आहे. कोकणात तुलनेने थंडी कमी जाणवेल.
37
पश्चिम महाराष्ट्र
पुण्यात किमान तापमान 16°C पर्यंत खाली गेले आहे, तर कोल्हापूरमध्ये 19°C इतके राहणार आहे. राज्यभर पावसाने माघार घेतली आहे.
उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे जळगावमध्ये पारा केवळ 10°C पर्यंत घसरेल. नाशिकमध्ये किमान तापमान 12°C इतके राहण्याची शक्यता आहे.
57
मराठवाडा
जालना, संभाजीनगर, परभणीमध्ये किमान तापमान 13-15°C दरम्यान राहणार आहे. नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली व बीडमध्येही थंडी कायम राहणार आहे.
67
विदर्भ
अमरावतीत तापमान 13°C पर्यंत उतरले आहे, तर नागपूरमध्ये 15°C आसपास राहणार आहे. आगामी दिवसांत राज्यभर थंडी वाढण्याची शक्यता आहे.
77
महाराष्ट्र गारठला
सध्या नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी नगण्य आहे. हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी इमरजन्सी अलर्ट जारी केला आहे.