राज्यात मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Published : Jun 16, 2026, 04:48 PM IST
Rain Alert

सार

हवामान विभागाने पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असून, मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचं म्हटलं आहे. या बातमीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा ३ भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

काही जिल्ह्यात पाऊस कोसळणार 

काही जिल्ह्यातच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. सध्या ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मान्सून होणार सक्रिय 

काही भागांमध्ये मान्सून हा सक्रिय होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश 

पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवल्यामुळं प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेर विजा चमकत असताना शक्यतो घराच्या बाहेर पडणे टाळावे. अनावश्यक प्रवास टाळावा असंही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सूनच्या या तारखेपर्यंत सरी बरसण्याची शक्यता, हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती
ठाकरे गटाचे ७ खासदार शिंदे सेनेच्या वाटेवर, आमदार कृपाल तुमाने काय म्हणाले?