नववर्षासाठी आतापासूनच जोरदार तयारी करण्यास बहुतांशजणांनी सुरुवात केली आहे. मात्र नववर्षाच्या सेलिब्रेशनवर नवी मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे. नियमांचे उल्लंन केल्यास कारवाई केली जाईल हे देखील पोलिसांकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.
New Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सर्वजण फार उत्सुक आहेत. पण या सेलिब्रेशनवर नवी मुंबई पोलिसांची (Navi Mumbai Police) करडी नजर असणार आहे. नवं वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नवी मुंबईतील पोलिसांनी आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी म्हटले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तीन उपायुक्तांसह अडीच हजार पोलीस कर्मचारी, सहा सहायक पोलीस आयुक्त, 53 पोलीस निरीक्षक आणि 176 पोलीस उपनिरीक्षक शहरात तैनात केले जाणार आहेत.
नववर्षाच्या सेलिब्रेशनवेळी नागरिकांनी कायदे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. याशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणीही अतिरिक्त पोलीस तैनात केले जाणार आहेत. मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात अभियान चालवले जाणार आहे. त्याचसोबत शहरात पोलीस बंदोबस्तही असणार आहे.
"पार्टी किंवा सेलिब्रेशन सुरू असलेल्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी असणार आहे. पण यावेळी नियमांचे पालन करावे लागेल. नवी मुंबई पोलिसांनी हे देखील स्पष्ट केलेयं, मद्यप्राशन करण्यावर बंदी नाही. पण मद्यप्राशन करून गाडी चालवण्यास परवानगी नाही. मद्यप्राशन करून गाडी चालवताना एखादा नागरिक सापडल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल" असेही भारंबे यांनी स्पष्ट केले आहे.
याव्यतिरिक्त नवी मुंबईतील मॉल्स वेळेवर बंद केले जातील. भारंबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद हालचाली किंवा छेडछाडीचे प्रकार घडल्यास नागरिकांनी तातडीने 112 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा.
आणखी वाचा:
मुंबईत RBIसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, या 2 मोठ्या व्यक्तींच्या राजीनाम्याची केली मागणी