
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरच भारतातील पहिलं ‘वॉटर टॅक्सी’ असलेलं विमानतळ ठरणार आहे. म्हणजेच ‘कोस्टल लक्झरी’ आणि ‘डेली कम्युट’ यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टअंतर्गत एकूण 8 वॉटर टॅक्सी मार्ग आणि 15 जेट्टी (बोट लागणाऱ्या घाट) उभारण्यात येणार आहेत. हे मार्ग मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसारख्या प्रमुख भागांना जोडतील. कल्पना करा… तुम्ही कारमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकून वैतागलेले नसता, तर समुद्राच्या शांत लाटांवरून सरळ एअरपोर्टकडे प्रवास करताय खरंच, "लाटांपासून रनवेपर्यंत" ही नवी गोष्ट आता शक्य होणार आहे!
ईको-फ्रेंडली: समुद्रमार्गाने प्रवास केल्याने इंधनाची बचत आणि पर्यावरणसंवर्धन
टाईम-सेव्हिंग: ट्रॅफिक टाळून डायरेक्ट वॉटर रूट्स
इंस्टा-वर्थी: सुंदर समुद्रदृश्य, लक्झरी टॅक्सी आणि हाय-एंड कम्युटिंग – काय पाहिजे अजून?
वॉटर टॅक्सी ही केवळ सुरुवात आहे. नवी मुंबई विमानतळावर हे ही फीचर्स असणार
टॉप-क्लास एअरक्राफ्ट रिपेअर आणि मेंटेनन्स फॅसिलिटीज
स्मार्ट पार्किंग सिस्टिम
रोड, रेल्वे, मेट्रो आणि आता वॉटर – सगळी कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी!
तुम्ही लांब प्रवासासाठी विमान पकडत असाल किंवा ऑफिसला जाण्यासाठी ट्रॅफिक टाळायचा विचार करत असाल – नवी मुंबईचा हा नवीन एअरपोर्ट तुमचं संपूर्ण ट्रॅव्हल एक्सपीरियन्स बदलून टाकणार आहे.