मुंबई - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संदेश वहनाच्या साधनांमध्ये अमुलाग्र बदल झाला. काळाच्या ओघात काही साधने मागे पडली. त्यात पोस्ट कार्डचे नाव नक्की घ्यावे लागेल. कधीकाळी याची लोक प्रतिक्षा करायचे. जाणून घ्या कार्डची माहिती आणि आठवणीत रममाण व्हा
पोस्टकार्डची सुरुवात भारतात १ जुलै १८७९ मध्ये झाली तत्पूर्वी पोस्टकार्डचा अविष्कार १८६९ मध्ये आॕस्ट्रियामध्ये प्रथम झाला. 'इमानुएल हरमान' यांनी पत्राचाराच्या माध्यमातुन प्रथम पोस्टकार्ड चा वापर केला. १८७२ मध्ये ब्रिटन मध्ये याचा वापर सुरु झाला. भारतात सुरु झालेल्या पहिल्या पोस्ट कार्डची किंमत फक्त ३ पैसे होती. त्यावेळी पहिल्या तिमाहित रु. ७.५० लाख पोस्टकार्डांचा खप झाला होता. पहिल्या पोस्टकार्डवर डिझाईन आणि छपाईचे काम मेसर्स थाॕमस डी ला रयू या लंडनच्या कंपनीने केले होते.
25
"ईस्ट इंडिया पोस्टकार्ड"
पहिले पोस्टकार्ड हे मध्यम हलके व भु-या रंगाचे छापले होते. या कार्डावर "ईस्ट इंडिया पोस्टकार्ड" असे छापले होते. मध्यभागी ग्रेट ब्रिटनचे राजचिन्ह तर वरच्या डाव्या बाजुला लाल भु-या रंगात राणी विक्टोरियाचा चेहरा होता. मात्र विदेशी पोस्टकार्डवर इंग्रजी तसेच फ्रेंच भाषेत " युनिवर्सल पोस्टल युनियन" असे लिहिले होते. कालपरत्वे पोस्टकार्डात बदल होत गेला. १८९९ मध्ये ईस्ट इंडिया हा शब्द जो पत्रावर होता तो काढुन "इंडिया पोस्ट" असे मुद्रण होऊ लागले.
35
तिकीटवाले पोस्टकार्ड
तदनंतर दिल्लीचे सम्राट जाॕर्ज पंचम यांच्या राज्यभिषेकाप्रित्यर्थ १९११ मध्ये केन्द्र तसेच प्रांतीय सरकारी प्रयोगासाठी" पोस्टकार्ड"हा शब्द मुद्रित केला गेला. स्वातंत्र्यानंतर हिरव्या रंगात त्रिमुर्तिची नवी डिझाईन असलेले तिकीटवाले पोस्टकार्ड ७ डिसेंबर १९४९ ला काढण्यात आले. १९५० मध्ये कोनार्क येथील घोड्यांची प्रतिमा असलेले पोस्टकार्ड तर २ ऑक्टोबर१९५१ ला तीन चित्रांची श्रुखंला असलेले पोस्टकार्ड काढण्यात आले. ज्यात मुलांसाठी गांधीबापू, चरखा चालवणारे गांधीबापू, कस्तुरबांसोबत गांधीबापू या चित्रांचा समावेश होता.
मात्र १९६९ ला गांधीजींच्या शताब्दी वर्षानिमित्त तीन पोस्टकार्डची आणखी एक श्रुखंला ज्यात महात्मा गांधी यांची मुखाकृती अंकीत होती.
मात्र या सर्वात पहिले चित्रीत पोस्टकार्ड १८८९ मध्ये फ्रान्स मध्ये आयफेल टाॕवरचे चित्र असलेले पोस्टकार्ड मुद्रित करण्यात आले होते.
55
पोस्टकार्डचा दैनंदिन व्यवहारात सर्रास वापर
मित्रांनो आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात दळणवळणाची अनेक साधने असली तरी आज करोडो भारतीय या पोस्टकार्डचा दैनंदिन व्यवहारात सर्रास वापर करताना दिसतात. आज ५० पैसे मुल्य असलेले हे दळणवळणाचे साधन सर्वांसाठी शुल्लक वाटत असले तरी सर्वसामान्यांसाठी आजही ही टपाल खात्याची सुवीधा सर्वांसाठी कार्यरत आहे जी अन्यत्र कुठेच पाहायला मिळणार नाही.