International Yoga Day 2025 : बघा PHOTOS, पुणे विमानतळाच्या टर्मिनसमध्ये योग दिन उत्साहात साजरा

Published : Jun 21, 2025, 01:18 PM IST

पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनलवर योग सत्र आयोजित केले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सत्राचे उद्घाटन केले. वेगवेगळी योगासने करीत योग दिन उत्साहात साजरा केला.

PREV
14
संदीप सिंग गिल यांचीही उपस्थिती

पुणे विमानतळावर आयोजित योग सत्रात पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक संदीप सिंही गिल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

24
दीप प्रज्वलन करुन उद्घाटन

यावेळी दीप प्रज्वलन करुन या योग सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. 

34
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित

पुणे विमानतळावर आयोजित केलेल्या योग सत्राला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यांनी पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. 

44
पांढुरंगासमोर योगाभ्यास

पुणे विमानतळाच्या टर्मिनसमध्ये पांढुरंगाचे शिल्प एका भिंतीवर बसविण्यात आले आहे. यावेळी या शिल्पासमोर योगाभ्यास करण्यात आला.

Read more Photos on

Recommended Stories