
Buldhana Bus Accident : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) महाराष्ट्रातील नाशिक आणि शिर्डी येथे देव दर्शनाला जाणाऱ्या बसचा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना बुलढाण्यात घडली असून बसची धडक पार्क केलेल्या ट्रकसोबत झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मल्कापूर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेबद्दल बुलढाणा शासकीय रुग्णालयातील जनरल सर्जन डॉ. अनंत मगर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टरांनी म्हटले की, 10 जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील असून नाशिक आणि शिर्डी येथे दर्शनासाठी जाणारे होते. पण त्यांची देव दर्शनाच्या बसचा अपघात झाला. यामध्ये एकूण 35 जण जखमी झाले आहेत.