मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर एनडीएतील महत्वाची जबाबदारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार एकाच मंचावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार आहेत. दोघेही एनडीए आघाडीच्या प्रचारासाठी सोबत येणार असून भाजाप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

vivek panmand | Published : May 15, 2024 7:57 AM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि त्यांच्या पक्षाने बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी एनडीए आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर सभा घेतल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एनडीए आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यावे अशी विनंती केली होती. 17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर - 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर दिसून येणार आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि मुंबई लोकसभा निवडणुकीसारखा उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपला पाठींबा देण्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एनडीए आघाडीचे काम करायला सुरुवात केली होती. 

मनसेच्या मतांवर एनडीए आघाडीचा डोळा - 
मनसेच्या मतांवर एनडीए आघाडीचा डोळा असून ती मते जास्तीत जास्त प्रकारे आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न चालू आहेत. मुंबईमध्ये मराठी मतांची संख्या जास्त असून मनसेकडे जास्तीत जास्त मराठी मते कशी मिळवून देता येईल याची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी मतांचे पारडे भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात पडल्यास निवडून येण्याची शक्यता वाढणार आहे. मनसेने मराठी मतांचा टक्का वाढवल्यास भाजपची मुंबईमधून जास्तीत जास्त खासदार निवडून येतील.
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर, नाशिकच्या सभेनंतर मुंबईत करणार रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज भरताना केले जोरदार शक्तिप्रदर्शन, महाराष्ट्रातील कोण कोण नेते होते उपस्थित?

Share this article