MHADA Pune Lottery 2025: पुणेकरांसाठी घर घेण्याची सुवर्णसंधी! तब्बल 6,168 घरांसाठी सोडत जाहीर

Published : Sep 13, 2025, 08:34 PM IST

MHADA Pune Lottery 2025: म्हाडाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत 6,168 घरांसाठी सोडत जाहीर. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार. अर्जासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड डिजिलॉकरवरून संलग्न करणे अनिवार्य.

PREV
14
तब्बल 6,168 घरांसाठी सोडत जाहीर

पुणे: पुणेकरांना हक्काचं घर मिळवण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. म्हाडा (MHADA) कडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत 6,168 घरांसाठी बंपर सोडत जाहीर करण्यात आली आहे. गृहस्वप्न साकार करण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार!

घरासाठी इच्छुक नागरिकांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यंदा अर्ज प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आधार कार्ड आणि पॅनकार्ड डिजिलॉकरवरून संलग्न करणं अनिवार्य असून, अर्जदारांनी डिजिलॉकरवर नोंदणी करणे गरजेचे आहे.

24
कोणत्या भागांतील घरे उपलब्ध?

पुणे विभागात समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये

पुणे

पिंपरी-चिंचवड

पीएमआरडीए क्षेत्र

सोलापूर

कोल्हापूर

सांगली

घरांची एकूण संख्या आणि वितरण

योजना / क्षेत्र सदनिकांची संख्या

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना 1,683

म्हाडा पीएमएवाय (PMAY) योजना 299

15% आणि 20% राखीव योजना 4,186

पुणे महापालिका हद्द 1,538

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द 1,534

पीएमआरडीए हद्द 1,114

एकूण सदनिका 6,168

34
अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाइट्सला भेट द्या.

https://housing.mhada.gov.in

https://bookmayhome.mhada.gov.in

https://lottery.mhada.gov.in

महत्त्वाच्या तारखा

नोंदणीची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2025

प्रारूप यादी जाहीर: 11 नोव्हेंबर 2025

दावे व हरकती सादर करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2025

अंतिम पात्र अर्जदार यादी: 17 नोव्हेंबर 2025

सोबत जाहीर होणार: 21 नोव्हेंबर 2025 

44
म्हाडा काय म्हणते?

म्हाडाच्या पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, यंदा संगणकीय सोडतीत आणखी पारदर्शकता आणली गेली आहे. मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी नागरिकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

तुमचं घर, तुमचं स्वप्न; आता साकार करा!

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक दुर्लभ आणि मोठी संधी आहे. वेळेवर अर्ज करा आणि तुमचं नाव सोडतीत यावं यासाठी तयारीला लागा!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories