MHADA Nashik Lottery: नाशिकचा MHADA धमाका!, प्राइम लोकेशनवर घर फक्त ₹१४ लाखांत; तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच ती सुवर्णसंधी!

Published : Dec 02, 2025, 01:18 PM IST

MHADA Nashik Lottery : म्हाडा नाशिक मंडळातर्फे 402 परवडणारी घरे लॉटरीद्वारे उपलब्ध होत आहेत. 14 ते 36 लाखांच्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, 'अ‍ॅडव्हान्स कंट्रिब्यूशन' मॉडेलअंतर्गत अर्जदारांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम भरता येणार आहे.

PREV
16
नाशिकच्या प्राइम लोकेशनवर फक्त 14 लाखांत स्वतःचं घर!

MHADA Nashik Lottery: नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! म्हाडा नाशिक मंडळ 14 ते 36 लाख रुपयांदरम्यानची परवडणारी घरे नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. ही घरे नेमकी कुठे मिळणार? त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या. 

26
स्वप्नातील घराची संधी, 402 नवीन घरं लवकरच लॉटरीद्वारे उपलब्ध!

आपलं स्वतःचं घर असावं, या अनेकांच्या स्वप्नाला आता गती मिळणार आहे. कारण म्हाडा नाशिक मंडळ शहरातील विविध भागांमध्ये एकूण 402 घरे 'अ‍ॅडव्हान्स कंट्रिब्यूशन' मॉडेलअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. या घरांसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयातून सोमवारी सुरू करण्यात आली.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, 2025 सालातील ही नाशिक मंडळाची चौथी लॉटरी असून याआधीच्या तीन लॉटरींमधून 846 घरे नागरिकांना देण्यात आली आहेत. “परवडणारी घरे सर्वांना उपलब्ध व्हावीत हा आमचा प्रयत्न,” असे ते म्हणाले. 

36
ही घरे कोणत्या भागात असणार आहेत?

सदर घरे खालील सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये देण्यात येणार आहेत.

चुंचाळे

पाथर्डी

मखमलाबाद

आडगाव

सातपूर शिवार 

46
अ‍ॅडव्हान्स कंट्रिब्यूशन तत्त्व म्हणजे काय?

या योजनेतील घरे सध्या बांधकाम प्रक्रियेत आहेत. लॉटरीत नाव निघाल्यावर अर्जदारांना घराची संपूर्ण किंमत पाच वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये भरण्याची सोय दिली आहे. त्यामुळे एकाचवेळी मोठी रक्कम भरण्याचा ताण कमी होतो. 

56
उपलब्ध घरांची संख्या, कोणत्या गटासाठी किती?

अल्प उत्पन्न गट (EWS/LIG)

चुंचाळे शिवार – 138 घरे

पाथर्डी शिवार – 30 घरे

मखमलाबाद – 48 घरे

आडगाव शिवार – 77 घरे

एकूण : 293 घरे

मध्यम उत्पन्न गट (MIG)

सातपूर शिवार – 40 घरे

पाथर्डी शिवार – 35 घरे

आडगाव शिवार – 34 घरे

एकूण : 109 घरे 

66
अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्जदारांनी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये खालीलपैकी कोणताही एक दस्तऐवज ग्राह्य धरला जाईल. तहसील कार्यालयातून मिळणारे उत्पन्न प्रमाणपत्र या दस्तऐवजांच्या आधारे अर्जदाराची पात्रता निश्चित केली जाणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories