हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?
हैदराबाद गॅझेट म्हणजे निझाम काळात (1918 च्या सुमारास) प्रकाशित केलेल्या अधिकृत दस्तऐवजांचे संकलन, ज्यात मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या भागांमधील विविध जाती-जमातींची माहिती आहे.
1901 साली झालेल्या जनगणनेनुसार या दस्तऐवजामध्ये “मराठा” आणि “कुणबी” समाजाला एकाच गटात समाविष्ट केल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत.
यामध्ये "मराठा-कुणबी" अशी ओळख देण्यात आली असून, मराठवाड्यात 36% लोकसंख्या मराठा-कुणबी अशी दर्शवलेली आहे.
हा ऐतिहासिक दस्तऐवज सध्या लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी, उत्तराखंड येथे संग्रहित आहे.
जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा दावा असा की, या गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेता येईल.