Maharashtra Rain : पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’, पुढील 24 तास महत्त्वाचे, आंदोलकांना नैसर्गिक आपत्तीलाही तोंड द्यावे लागेल

Published : Sep 02, 2025, 02:51 PM IST

हवामान खात्याने पुणे, कोल्हापूर आणि सातारा या भागाला यलो अलर्ट दिला आहे. तसेच इतरही काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज आहे. जाणून घ्या पुढील २४ तास महत्त्वाचे…

PREV
16

सध्या देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाची परिस्थिती आहे. विशेषतः जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या राज्यांत प्रचंड पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. आजपासून महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ आहे.

26

हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पुढील २४ तासांत हे वारे वायव्य दिशेला सरकून कमी दाबाचा पट्टा तयार करतील. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोरदार प्रभाव दिसणार आहे. गेल्या महिन्यात पावसाने हजेरी लावली होती, तोच वेग सप्टेंबरच्या सुरुवातीलाही कायम राहील.

36

कुठे किती पाऊस पडणार?

२ सप्टेंबर : विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, संपूर्ण मराठवाडा, उर्वरित विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट.

३ सप्टेंबर : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच पुणे-सातारा-कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. चंद्रपूर व गोंदियालाही ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट.

46

४ सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर व नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग, मुंबई, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट.

५ सप्टेंबर : रायगड व पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नाशिक घाटमाथा यलो अलर्ट. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यांनाही यलो अलर्ट.

56

पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही भागांत अति-मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

66

आझाद मैदानात आंदोलन सुरु असताना पाण्याचा जोर वाढला तर आंदोलकांना आणखी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. आधीच आझाद मैदानात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे आंदोलकांना तेथे थांबणेही अपघड झाले आहे.

Read more Photos on

Recommended Stories