मासिक पाळीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या? नेमकी प्रकरण काय ?

पहिल्यांदा मासिक पाळीचा सामना करताना आलेल्या नैराश्यातून मलाड येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरंच मासिक पाळीचा  त्रास होतो का ? त्रासामागील नेमकं कारण काय जाणून घ्या संपूर्ण प्रकरण. 

Ankita Kothare | Published : Mar 28, 2024 7:47 AM IST

मुंबई : मासिक पाळीत अनेक महिलांना भयंकर त्रास होत असतो. मात्र त्यांना हा काळ काही क्षणाचा असल्याचे माहित असते. त्यामुळे ते सहन करण्याची दैवी शक्ती त्यांच्यात असते. प्रत्येक महिलेला पाळी येण्याच्या आधी किंवा त्याकाळात मूड स्विंग्स, पोटदुखी आणि अंगदुखी हा प्रामुख्याने त्रास होत असतो. मात्र, हाच त्रास सहन न झाल्याने मुंबईतील मालाड येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खबळल उडाली असून मुलीच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मलाड मधील खारोडी परिसरात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. मृत मुलगी ही तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. मंगळवारी घरी कुणी नसतांना तिने घरातील लोखंडी सळीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना तिच्या पालकांसह शेजाऱ्यांना लक्षात आली.त्यांनी तिला तातडीने स्थानिक कांदिवली येथील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारांपूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी आले.याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबाब दिला. मृत मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास झाला. यामुळे ती तणावात तसेच नैराश्यात होती. हा त्रास असह्य झाल्याने तिने गळफास लावून आत्महत्या केली असावी असे तिच्या पालकांनी दिलेल्या जबाबात सांगण्यात आले आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वेदनादायी मासिक पाळीमागची महत्त्वाची कारणे:

मासिक पाळीतील वेदना गंभीर असतात का ?

ज्या स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होतो त्यांच्यापैकी अनेकींना वेदनाशामक किंवा अॅन्टी-इन्फ्लामेटरी औषध घेऊन आराम मिळू शकतो. मात्र, काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेमागे इतर आजार असू शकतात. असाच एक आजार म्हणजे गर्भाशयातील फायब्रॉईड्स. फायब्राईड्स म्हणजे अशा गाठी ज्या कॅन्सरच्या नसतात आणि त्या गर्भाशयाच्या आत किंवा सभोवती येतात. अशा गाठींमुळेदेखील मासिक पाळीत मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव आणि तीव्र वेदना होतात.

पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज या कंडिशनमुळेही मासिक पाळीत वेदना होतात. गर्भाशय, फेलोपिअन ट्युब किंवा अंडाशयातील जीवाणू संसर्गाला पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज म्हणतात.क्लॅमिडिया आणि गोनोरिया यासारखे सेक्च्युली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे जीवाणू पीआयडीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे ज्यांना हा संसर्ग आहे अशा व्यक्तीशी ठेवलेल्या असुरक्षित शरीर संबंधामुळे पीआयडी होऊ शकतो. असं असलं तरी मासिक पाळीदरम्यान ओटीपोटात होणाऱ्या वेदनांमागे एंडोमेट्रिओसीस हे कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण आहे.

आणखी वाचा :

अंबाजोगाई येथे खोदकामादरम्यान पुरातत्व विभागाला सापडले दोन मंदिरांचे अवशेष

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दिग्गज नेत्यांना दिलीय जबाबदारी

Special Train : नागपुर ते मडगावदरम्यान जूनपर्यंत चालवली जाणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Share this article