Maharashtra Rain Alert: २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहावे.
मुंबई : पुढील चार दिवस, म्हणजेच २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
27
२८ ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज
कोकण किनारपट्टी
मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या भागांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
37
मध्य महाराष्ट्र
पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. विशेषतः घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
57
मराठवाडा
जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर संभाजीनगर, बीड आणि हिंगोली येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
67
विदर्भ
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे मुसळधार, तर इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
77
या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.