Maharashtra Weather Alert: ऑक्टोबरची सुरुवात जोरदार पावसाने!, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published : Sep 30, 2025, 10:03 PM IST

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

PREV
17
1 ऑक्टोबरपासून हवामान पुन्हा बदलण्याची चिन्हं

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, हवामान विभागाने काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी 1 ऑक्टोबरपासून हवामान पुन्हा बदलण्याची चिन्हं आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात राज्यातील विभागनिहाय हवामानाचा अंदाज.

27
कोकणात ढगाळ वातावरण आणि मध्यम पावसाची शक्यता

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही अलर्ट नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. 

37
पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. घाटमाथ्यांवर वातावरण ढगाळ राहणार आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून, शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

47
मराठवाड्यात काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

57
उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी, काही ठिकाणी विजांचा कडकडाट

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विशेषतः नाशिक घाटमाथा आणि आसपासच्या भागांमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

67
विदर्भात काही जिल्ह्यांना दिलासा, तर काही ठिकाणी यलो अलर्ट

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, जेथे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. पण चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, या चार जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

77
एकूणच काय?

राज्यात 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा पावसाचा जोर जाणवू शकतो. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर मराठवाडा व विदर्भातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. एकूण 5 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories