Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तीव्र झाली असून, नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात गारठा वाढला असून, मुंबई आणि कोकणातही थंडीचा प्रभाव जाणवत आहे.
पुणे : महाराष्ट्रात थंडीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानात मोठी घट नोंदवली जात असून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अवघ्या 5 अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठ्याची तीव्रता कायम असून राज्यभर थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.
28
23 डिसेंबरला राज्यभर तापमानात घट कायम
सोमवार, 23 डिसेंबर रोजीही राज्यातील सर्वच भागांत तापमानाचा पारा घसरलेला राहणार आहे. सकाळी धुके, थंड वारे आणि रात्री कडाक्याची थंडी असा हवामानाचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे.
38
मुंबई आणि कोकणातही थंडीचा शिरकाव
मुंबईत आता हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे.
कमाल तापमान : 32 अंश सेल्सिअस
किमान तापमान : 14 अंश सेल्सिअस
दिवसभर हलकं धुके राहण्याची शक्यता असून कोकणातील इतर भागांतही अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.