Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषेच्या निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर, 9 जागांसाठी असे असणार गणित

Published : Apr 16, 2026, 12:44 PM IST
vidhan bhavan

सार

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे. संख्याबळाच्या आधारावर महायुतीला स्पष्ट आघाडी असून 8 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकालही जाहीर करण्यात येणार आहे.

कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांची पार्श्वभूमी

विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे, श्रीकांत शिंदे, अमोल मिटकरी, शशीकांत शिंदे, गोपीचंद पडळकर, रजनीसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रविण डाके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.

जागांचे संभाव्य राजकीय समीकरण

सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे महायुतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

महायुतीची मजबूत पकड

विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवारासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे असलेले एकूण 234 आमदारांचे संख्याबळ पाहता त्यांचे 8 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ 49 असल्याने त्यांना एकच जागा निश्चित मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या जागेसाठी आवश्यक 10 मतांची जुळवाजुळव करणे सध्या कठीण दिसत आहे.

विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ

राज्यातील विधानसभेतील पक्षनिहाय ताकद या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40, काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10, शिवसेना (ठाकरे गट) 20, समाजवादी पक्ष 2, तर इतर लहान पक्ष आणि अपक्ष आमदार मिळून उर्वरित संख्या आहे.

निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता

महायुतीच्या भक्कम संख्याबळामुळे बहुतेक जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी अतिरिक्त उमेदवारी आणि क्रॉस-व्होटिंगच्या शक्यतेमुळे निवडणूक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'