Maharashtra Unseasonal Rain Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा 'हाय अलर्ट' जारी केला. यापैकी ९ जिल्ह्यांत ऑरेंज तर २३ जिल्ह्यांत यलो अलर्ट असून, गारपिटीसह ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
महाराष्ट्र पावसाच्या छायेखाली! ३२ जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट
मुंबई: एप्रिलच्या सुरुवातीलाच वरुणराजाने महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री केली असून, अवकाळी पावसाचे संकट अधिक गडद झाले आहे. हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, २ एप्रिल रोजी राज्यातील तब्बल ३२ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. यामध्ये ९ जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' तर २३ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, गारपिटीसह ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
27
कुठे असेल पावसाचा जोर? (विभागनिहाय अंदाज)
१. पश्चिम महाराष्ट्र: पुण्याला ऑरेंज अलर्ट
पुणे जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, येथे ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे आणि जोरदार पाऊस होऊ शकतो. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये मध्यम पावसासह गारपिटीची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' दिला आहे. कोल्हापुरात मात्र पावसाचा जोर कमी असेल.
37
२. उत्तर महाराष्ट्र: ५ जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर (अहमदनगर) या पाचही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. येथे मेघगर्जनेसह तुफान पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' असून वाऱ्याचा वेग ५०-६० किमी राहील. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये 'यलो अलर्ट' असल्याने काढणीला आलेल्या पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
57
४. विदर्भ: ११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि वाशिम या सर्व ११ जिल्ह्यांत ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील.
67
५. कोकण: मुंबईसह किनारपट्टीवर पावसाची हजेरी
ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत 'यलो अलर्ट' असून वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्गात हलक्या ते मध्यम सरी कोसळतील.
77
नागरिकांना आणि शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
वीज पडण्यापासून सावध राहा: पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.
पिकांची सुरक्षा: काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा.
पशुधनाची काळजी: वीज आणि वादळामुळे पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना सुरक्षित गोठ्यात बांधा.