Maharashtra Tourist Alert : पावसाळ्यात 'या' धोकादायक ठिकाणांवर प्रवेशबंदी; 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद

Published : Jun 25, 2025, 08:23 AM ISTUpdated : Jun 25, 2025, 09:52 AM IST
Kalsubai

सार

सध्याच्या पावसाच्या दिवसात महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागे वेगवेगळी कारणे असण्यासह अशा ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटनाही वाढल्या गेल्यात.

पावसाळ्यामुळे वाढलेला धोका आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्रातील काही लोकप्रिय पर्यटनस्थळांवर वन विभागाने १० ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई, रतनगड, अलंग, मदन, कुलंग आणि सांदण दरी येथे मुसळधार पावसामुळे जंगलवाटा निसरड्या झाल्याने आणि अपघाताचा धोका वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत या ठिकाणांची सोशल मीडियावर प्रसिद्धी वाढल्यामुळे सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र काही ठिकाणी अपघात घडल्यामुळे आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.

भंडारदरा वन परिक्षेत्रातील मर्यादा:

  • इतर धबधबे आणि पर्यटकस्थळांवर देखील नियंत्रण आणले असून, एका दिवसात फक्त ५०० पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
  • दुपारी तीननंतर मुक्कामासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
  • सेल्फी, व्हिडीओ रील्स करण्यास बंदी घालण्यात आली असून, छायाचित्रणासाठी वन विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
  • कर्मचाऱ्यांशी वाद घालणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे नाशिकचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.

प्रवेशबंदीचे कारणे:

  • जंगलवाटा अतिशय निसरड्या झाल्या आहेत.
  • धुक्यामुळे मार्ग चुकण्याचा धोका वाढला आहे.
  • अरुंद व निमुळते रस्ते अपघातप्रवण झाले आहेत.
  • पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रवेशबंदी आवश्यक आहे.

सह्याद्री क्रोटनचे संरक्षण:

हरिश्चंद्रगडावर सह्याद्री क्रोटन (Croton gibsonianus) ही अत्यंत दुर्मीळ वनस्पती आढळते. जगात केवळ या भागात आढळणारी ही वनस्पती १८० वर्षांनंतर अलीकडेच पुन्हा सापडली आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तिच्या संवर्धनासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, आणि पर्यटकांमुळे होणाऱ्या अडथळ्यांपासून बचावासाठी ही ठिकाणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट