मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असल्याने 'यलो अलर्ट' आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' असून, या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मात्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.