राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. हवामान खात्याकडून 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यातील घाट परिसरासाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यासाठी मात्र कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
25
सातारा जिल्ह्याला अलर्ट
सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागात पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी आहे. येथे विजांचा कडकडाट होण्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
35
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. राधानगरी धरण परिसरातील नदीपात्रात पाण्याची पातळीही वाढलेली आहे. पुढील 24 तासांत कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष अलर्ट जाहीर केलेला नाही. या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
55
यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.