Ganeshotsav Special MEMU: मुंबईला परतीचा प्रवास आता अधिक सोपा!, कोकणातून येणाऱ्यांसाठी रेल्वेची खास सोय

Published : Aug 28, 2025, 11:16 PM IST

Ganeshotsav Special MEMU: गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने विशेष मेमू गाड्यांची व्यवस्था केली. चिपळूण ते पनवेल, एलटीटी ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या या गाड्या प्रवाशांना गर्दी टाळून प्रवास करण्यास मदत करतील.

PREV
16

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधून कोकणात आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. गणपती विसर्जनानंतर या सर्वांची परतीची वाट पाहणं ओघाने आलं. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष तयारी केली असून, कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी खास अनारक्षित मेमू (MEMU) गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

26

चाकरमान्यांसाठी रेल्वेचं गणेशोत्सवात खास नियोजन

यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वेने तब्बल 380 विशेष गाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे. यापैकी 310 गाड्या फक्त मध्य रेल्वेकडून कोकण आणि इतर भागांमध्ये धावणार आहेत. या विशेष गाड्या केवळ कोकणात जाणाऱ्यांसाठी नव्हे, तर मुंबईकडे परतणाऱ्यांसाठीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

36

चिपळूण ते पनवेल अनारक्षित मेमू, कोकणातून मुंबईकडे परतीचा विश्वासार्ह मार्ग

विशेषतः विसर्जनानंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन चिपळूण ते पनवेल दरम्यान अनारक्षित मेमू गाडी सोडण्यात येणार आहे, जी प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे.

46

मेमू गाडीचं वेळापत्रक

गाडी क्रमांक 01160 (चिपळूण-पनवेल)

दिनांक: 3 व 4 सप्टेंबर

वेळ: सकाळी 11:05 ला चिपळूणहून सुटेल

आगमन: संध्याकाळी 4:10 ला पनवेलला पोहोचेल

गाडी क्रमांक 01159 (पनवेल-चिपळूण)

दिनांक: 3 व 4 सप्टेंबर

वेळ: संध्याकाळी 4:40 ला पनवेलहून रवाना

आगमन: रात्री 9:55 ला चिपळूणला

थांबे असलेले स्थानके:

अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमाटणे.

एलटीटी-सावंतवाडी विशेष गाडी - अधिक पर्याय, अधिक सोय

गणेशभक्तांसाठी आणखी एक दिलासादायक पर्याय म्हणजे एलटीटी-सावंतवाडी विशेष ट्रेन. ही गाडी 28, 31 ऑगस्ट तसेच 4 व 7 सप्टेंबर रोजी दोन्ही दिशांनी धावणार आहे.

56

गाडी क्रमांक 01131 (एलटीटी–सावंतवाडी)

प्रस्थान: सकाळी 8:45 वाजता एलटीटीहून

आगमन: रात्री 10:20 वाजता सावंतवाडीला

गाडी क्रमांक 01132 (सावंतवाडी–एलटीटी)

प्रस्थान: रात्री 11:20 वाजता सावंतवाडीहून

आगमन: दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता एलटीटीला

प्रमुख थांबे:

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप.

66

गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनानंतर सुरक्षित आणि सोयीस्कर परतीचा प्रवास हाच प्रत्येक चाकरमानीचा हक्क आहे. रेल्वे प्रशासनाने यंदा विशेष गाड्यांच्या माध्यमातून हा प्रवास अधिक सुलभ केला आहे. त्यामुळे गर्दी आणि ताण न घेता, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories