Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे घाटमाथा यांसह अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील ३ ते ४ दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने शुक्रवार ते रविवारपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
24
हवामान विभागाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि चक्रीय स्थितीमुळे पुढील चार दिवस राज्यभर पावसाचे प्रमाण वाढणार आहे. काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता मुसळधार सरींनी हजेरी लावली असून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तासभरापासून पावसाला सुरुवात झाली आहे.
34
शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळत असला तरी ग्रामीण भागात मात्र या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असताना आणखी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.