Maharashtra Rain Alert : मुसळधार पावसाचा कोकण किनारपट्टीला फटका; मुंबईसह ठाणे-पालघर-रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

Published : Sep 29, 2025, 09:23 AM IST

Maharashtra Rain Alert : 28 सप्टेंबरला रेड अलर्टनंतर कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा मारा कायम आहे. 29 सप्टेंबरलाही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

PREV
14
मुंबईत पावसाचा जोर वाढला

मुंबई आणि उपनगरात काल दिवसभर पावसाने जोर धरला होता. आज सकाळपासूनही मुसळधार सरी सुरू असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईतील काही भागांत वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

24
ठाणे, नवी मुंबईतील स्थिती

ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

34
पालघरमध्ये मुसळधार पाऊस

पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागांसह किनारी भागात पावसाने थैमान घातले आहे. नाले, ओढे आणि लहान नद्या तुडुंब भरून वाहत असून काही खेड्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. वसई- विरार परिसरही जलमय झाला असून प्रशासन सतर्कतेच्या मोडवर आहे.

44
रायगडला रेड अलर्ट

रायगड जिल्ह्यात काल रेड अलर्ट होता आणि दिवसभर पाऊस झाला. आजही घाटमाथा आणि किनारी भागांत पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही डोंगराळ भागांत भूस्खलन झाल्याने प्रशासनाने अतिरिक्त खबरदारीचा इशारा दिला आहे.

Read more Photos on

Recommended Stories