Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात घोंगावतंय चक्रीवादळ, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Published : Oct 03, 2025, 08:35 AM IST

Maharashtra Rain Alert : बंगालच्या खाडी आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तीव्र होत आहेत. 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान हवामान अस्थिर राहणार असून महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ दिसेल. मान्सून 5 ऑक्टोबरपर्यंत माघारी जाण्याची शक्यता आहे.

PREV
16
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तीव्र

उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी विक्षोभाचा परिणाम अधिक जाणवेल. त्यामुळे हवामानात मोठे बदल होऊन 6 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातही या बदलाचा परिणाम होत असून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. मात्र पाऊस झाला तरी गारवा येणार नाही.

26
अरबी समुद्रातही वादळाची चिन्हं

गुजरातजवळ अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता वाढत आहे. पुढील 24 तासांत हवामानात मोठे बदल दिसून येऊ शकतात. हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

36
मान्सून माघारीची उलटी गिनती

5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतीचा पाऊस जाण्याची शक्यता आहे. मात्र वादळामुळे अवकाळी पावसाचं संकट कायम राहू शकतं. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट जाणवणार असून रात्री दमट वातावरणामुळे उकाडा वाढणार आहे. यंदा "ला निना"मुळे कडाक्याची थंडी पडेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

46
10-12 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम

विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपात राहील. आज कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

56
75 किमी वेगाने वारे; सावधानतेचा इशारा

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात हवामान अस्थिर आहे. किनारी भागात ताशी 65 ते 75 किमी वेगाने वारे वाहत आहेत. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

66
महाराष्ट्रावरही परिणाम

चक्रीवादळामुळे ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहारसह मध्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुजरात आणि महाराष्ट्रावरही या वादळाचा परिणाम होणार असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.

Read more Photos on

Recommended Stories