'मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अटळ'
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, जरांगे यांना संविधानाचे ज्ञान नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही, तर ते संविधानानुसारच मिळते. जरांगे यांच्या कृतीमुळे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला. हा संघर्ष भविष्यात तीव्र होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आणि त्यांनी सावध राहावे, असे आवाहन केले.