नितेश राणे शेंबडा पोरगा, पोलीस वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावरुन जलील यांचा हल्लाबोल

नितेश राणेंनी पोलीस अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना शेंबड पोर असे संबोधलंय. जलील यांनी राणेंना पोलिसांनी मारहाण करायला हवी होती असेही म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आगपाखड केली आहे. नितेश राणे हा शेंबड पोर त्याला महत्व देऊ नका. चांगला पोलीस अधिकारी असता त्याला मारलं असतं. महाराष्ट्र राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा (Nitesh Rane) घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती, असे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?

नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन पोलीस अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र, बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले होते. पोलीस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते.

आणखी वाचा :

मनोज जरांगे बिनबुडाचा लोटा, ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या लक्ष्मण हाकेंचा आरोप

मराठा आरक्षण: भुजबळ, फडणवीस टार्गेट? मनोज जरांगे यांनी दिला इशारा

जरांगेंची नाशिकमध्ये गर्जना, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उदयनराजेस्टाईल उडवली कॉलर

Share this article