Police Bharti 2025: खाकी वर्दीचं स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी! 15,300 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस उरले

Published : Nov 13, 2025, 03:56 PM IST

Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलात 15,300 पदांसाठी पोलीस भरती 2025 प्रक्रिया सुरू झाली. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, वाहनचालक, एसआरपीएफ शिपाई अशा विविध पदांचा समावेश असून, उमेदवारांना वयोमर्यादेत विशेष सवलतही दिली. 

PREV
16
खाकी वर्दीचं स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी!

Police Bharti 2025: महाराष्ट्रातील पोलीस दलात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! राज्यात 15,300 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षीची ही भरती म्हणजे खाकी वर्दी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी शेवटची आणि महत्वाची संधी आहे. 

26
कोणत्या पदांसाठी भरती?

या भरतीमध्ये पुढील पदांचा समावेश आहे.

पोलीस शिपाई

पोलीस शिपाई (वाहनचालक)

एसआरपीएफ शिपाई

पोलीस बँड्समन

कारागृह शिपाई

इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची परवानगी आहे. 

36
पात्रता आणि निवड प्रक्रिया

उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता चाचणी (50 गुण) आणि लेखी परीक्षा (100 गुण) या दोन टप्प्यांवर आधारित निवड प्रक्रिया असेल.

अंतिम निवड ही दोन्ही परीक्षांतील गुणांच्या आधारे केली जाईल.

शारीरिक चाचणीतील प्रकार:

धाव, गोळाफेक, लांब उडी

उंचीचे निकष:

पुरुष उमेदवारांसाठी – किमान 165 सेंमी

महिला उमेदवारांसाठी – किमान 155 सेंमी 

46
वयोमर्यादेत सवलत, जुन्या उमेदवारांसाठी दिलासा

राज्य सरकारने यंदा उमेदवारांना एक वर्षाची अतिरिक्त वयोमर्यादा सवलत दिली आहे. त्यामुळे मागील वर्षी वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या निर्णयामुळे अनेकांच्या खाकी वर्दीचं स्वप्न साकार होणार आहे. 

56
अर्ज कसा करायचा?

या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 30 नोव्हेंबर 2025 आहे.

66
शेवटची संधी गमावू नका!

खाकी वर्दी परिधान करून देशसेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांनी ही संधी गमावू नये. केवळ काहीच दिवस अर्जासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे त्वरित तयारीला लागा आणि तुमचं स्वप्न वास्तवात आणा!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories