Nanded-Hadapsar Train: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नांदेड ते हडपसर (पुणे) साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०२५ मध्ये धावणारी ही गाडी लातूर-कुर्डुवाडी मार्गावरून जाणार असल्याने या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणारय.
पुणे: नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नांदेड–हडपसर (पुणे) दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या ट्रेनमुळे लातूर–कुर्डुवाडी मार्गावरील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे.
25
विशेष गाड्यांचे वेळापत्रक
नांदेड–हडपसर साप्ताहिक विशेष (गाडी क्र. 07607)
ही गाडी 18 व 25 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडहून सकाळी 08:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 09:40 वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.
हडपसर–नांदेड साप्ताहिक विशेष (गाडी क्र. 07608)
ही गाडी देखील 18 व 25 नोव्हेंबर 2025 रोजी हडपसरहून रात्री 10:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता नांदेडला पोहोचेल.
35
थांबे कोणकोणत्या स्थानकांवर?
या साप्ताहिक विशेष गाडीला खालील स्थानकांवर थांबे असतील.