हवामान खात्याकडून गुरुवारसाठी (25 जुलै) मुंबईसाठी यल्लो अॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Monsoon Upadates : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अशातच मुंबई-पुण्यात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे हवामान खात्याकडून 25 जुलैला मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कर्नाटक ते गुजरातपर्यंतच्या वाऱ्याचा वेग बदलण्यासह वाढणार असल्याने मुंबईसह काही परिसरात बेफाम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने लोकल सेवा 10-15 मिनिटांनी उशिराने सुरू आहे.
महाराष्ट्रासाठी हवामान खात्याकडून अॅलर्ट
महाराष्ट्रातील पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने पालघरसह ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला असून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय पालघरमधील वाडा विक्रमगडमधील महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईतही जोरदार पावसाची शक्यता असल्याने शहराला यल्लो अॅलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरीतही मुसळधार पावसाची शक्यता असून तेथे ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.
पुण्यात रहिवाशी परिसरातील शिरले पाणी
पुण्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे रहिवाशी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशातच नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. एवढेच नव्हे पुण्यात विजेच्या धक्क्याने तीन तरुणांनी जीव गमावला आहे.
हवामान खात्यानुसार, पुण्यात आतापर्यंत 567.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्यपणे पुण्यात 4201.1 मिमी पावसाची नोंद होते. सध्या पुण्यासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रशासन हाय अॅलर्ट मोडवर
मुंबई आणि कोकणच्या समुद्र किनारपट्टीच्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना हाय अॅलर्ट मोडवर राहण्याचे निर्देशन दिले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे स्थानिक प्रशासन, महापालिका आणि पोलिसांनी हवामान खात्याकडून नियमित रुपात पावसाचे अपडेट्स घेत नागरिकांच्या मदतीसाठी प्लॅन करावा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आणखी वाचा :
पूर्व विदर्भात पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत
मध्य रेल्वे घेणार 6 दिवसांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या A टू Z माहिती एका क्लिकवर