
Maharashtra Rain Update : मुंबईसह कोकणात लवकरच दाखल झालेला मान्सून सध्या स्थिरावलेला असतानाच, हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत राज्यात मोठ्या हवामान बदलांचा इशारा दिला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत सुरुवातीला जोरदार पाऊस, आता उकाड्याचा त्रास
मान्सून आगमनाच्या दिवशी मुंबईत जोरदार पावसाचा दणका बसला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून, परिणामी मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि तापमानामुळे नागरिक पुन्हा एकदा घामाघूम होत आहेत.
पुढील तीन आठवडे देशभर पावसाचा जोर
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० जूनपर्यंत देशात आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
संपूर्ण देशात पुढील तीन आठवड्यांत सरासरीहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर
गुरुवार:
अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
सांगली, कोल्हापूर
शुक्रवार:
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर
अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
शनिवार व रविवार:
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पावसात मोठी वाढ होणार - हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज
हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, जरी सध्या देशात पावसाचे प्रमाण सरासरीहून ३२ टक्के कमी आहे, तरी पुढील काळात परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. युरोपियन आणि भारतीय हवामान मॉडेल्सनुसार, जून महिन्यात एकूण पाऊस १०८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.