Maharashtra Monsoon: मुसळधार पावसाचा इशारा, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Published : Jul 06, 2025, 12:00 PM IST
Rain Alert In 28 June 2025

सार

राज्यात पावसाचा जोर वाढत असून, कोकणसह काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगरसह ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ४८ तास ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात पाऊस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोकण, भागासह इतर काही भागांमध्ये मान्सून मुसळधार पडत आहे. या आठवड्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज ६ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरसह ६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२ जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात काही बदल जाणवत असून पुढील ४८ तास मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

पुढील ४८ तास हीच स्थिती कायम राहणार - 

पुढील ४८ तास हीच स्थिती कायम राहणार आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाट तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या 4 जिल्ह्यात 30 ते 40 किमी तासी वेगाने वारे वाहतील तसेच सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी 

मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळं शेतकरी आणि नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील काही काळ पाऊसाची सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना भागात पाऊस पडणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!