वाचनाची आवड आहे? राज्याच्या या शहरात उभारलीय चक्क पुस्तकांची बाग

Maharashtra: डिजिटलच्या युगात आता सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण भावी पिढीमध्येही वाचन संस्कृती रूजावी म्हणून जळगावात चक्क पुस्तकांचा बगीचा उभारण्यात आला आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…

Garden of book : आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे बगीचे पाहिले असतील. फुलाचे, फळांचे, लहान मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून खेळण्याची वेगवेगळी सामग्री असणारेही बगीचे आपण पाहिले असतील. पण पुस्तकांचा बगीचा कधी पाहिला आहे का? महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांचा बगीचा आपल्या राज्यातच उभारण्यात आला आहे.

भावी पिढीमध्येही वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. राज्यातील जळगाव (Jalgaon) येथील एका शहरामध्येही स्थानिकांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी एक नवा उपक्रम महापालिकेकडून (Municipal Council) सुरू करण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या ज्ञानात भर पडेल हे नक्की.

पुस्तकांची बाग

जळगावातील एरंडोल (Erandol) नगरपरिषदेने तब्बल 33 गुंठे जमिनीवर पुस्तकाचा बगीचा उभारला आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुस्तकांचा बगीचा हा राज्यातील एकमेव अनोखा उपक्रम असल्याचे म्हटलं जात आहे. एरंडोल शहरातील बीघा भर जागेच्या ठिकाणी हा बगीचा आहे. येथे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. येथे वाचन कट्टे देखील बांधण्यात आले आहेत.

निसर्गरम्य वातावरण

महत्त्वाचे म्हणजे निसर्गाच्य सान्निध्यात वाचनाचा आनंद स्थानिकांना लुटता येणार आहे.मोठमोठ्या झाडाखाली पुस्तके ठेवण्यात आली आहे. लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांना आवडतील अशाच पुस्तकांचा संग्रह येथे ठेवण्यात आला आहे. कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके येथे तुम्हाला सहज मिळतील.

राज्यातील पहिलाच अनोखा प्रयोग

एरंडोल नगर परिषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा (Book Garden) हा राज्यातला पहिलाच अनोख प्रयोग असल्याचे म्हटलं जात आहे. सर्व घटकांचा विचार करूनच या बागेची रचना करण्यात आली आहे.

Content/Photo Credit : महासंवाद वेबसाइट

आणखी वाचा:

Farming Tips : बियाणे-खते खरेदी करताना या गोष्टींकडे करताय दुर्लक्ष? होईल मोठे नुकसान

Success Story : कलेतून घडवला स्वतःचा बिझनेस, वाचा माळशेज घाटातील तरूणाची प्रेरणादायी कहाणी

‘शासन आपल्या दारी’ शेतकऱ्याच्या आयुष्यात चमत्कार करी, सरकारी योजनेमुळे आले शेतकऱ्याला अच्छे दिन

Share this article