Maharashtra : राज्यात अवकाळी पावसासह उष्माघाताची स्थिती पुढील काही दिवस राहणार, जाणून घ्या मुंबईतील तापमानाची स्थिती

Weather Update : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात अवकाळी पावसासह पुढील काही दिवस उष्माघाताचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. याशिवाय पुढील सात दिवसात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त केलीय. 

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या स्थितीसह उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हवमानान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पाऊस आणि उष्माघाताची स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील सात दिवसांपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासंदर्भात अ‍ॅलर्ट
हवामान खात्यानुसार कोकण गोव्यात 21 आणि 22 एप्रिलला वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील तापमान कोरडे राहणार आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडासह विदर्भात पुढील पाच ते सात दिवसांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आहे. अशातच हवामान खात्याने येलो अ‍ॅलर्टही जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्माघाताची देखील शक्यता आहे.

या जिल्ह्यातील तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पार
 राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पार गेले आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान जळगावात नोंदवण्यात आले आहे. जळगावातील तापमान 43.2 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले गेले. संभाजीनगरमधील तापमान 42.2 डिग्री सेल्सिअस आणि परभणीतील तापमान 42.5 डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती.

मुंबईतील हवामानाचा अंदाज
पुण्यात पुढील पाच ते सात दिवस ढगाळ वातावरण राहिल. याशिवाय हलक्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह समुद्र किनाऱ्यालगतच्या ठिकाणच्या तापमानात घट झाल्याचे दिसून येईल. यामुळे मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळेल.

मुंबईत मोडला एप्रिल महिन्यातील तापमानाचा रेकॉर्ड
मुंबईत मंगळवारी (16 एप्रिल) तापमानचा पारा वाढल्याचे दिसून आले. शहरात तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याची माहिती हवमान खात्याने दिली. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, 16 एप्रिलला सांताक्रुझ येथील वेधशाळेने 39.7 डिग्री तापमानाची केली होती. याशिवाय कुलाबा येथील वेधशाळेने 35.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली होती. 

आणखी वाचा : 

RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार

मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ

Share this article