सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल याची गॅरंटी नसते. कोणी कधी उंचावरून उडी मारताना व्हिडीओ टाकते, तर कोणी एखाद्या ठिकाणी जाऊन प्रचंड जेवण करण्याचा प्रयत्न करते.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल याची गॅरंटी नसते. कोणी कधी उंचावरून उडी मारताना व्हिडीओ टाकते, तर कोणी एखाद्या ठिकाणी जाऊन प्रचंड जेवण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी मिळत असली तरी जीवाला धोका उत्पन्न हा होऊ शकतो. आता एका छोट्या मुलीचा इंस्टाग्रामवर व्हिडीओ आला असून तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
मुलगी काय करते? -
या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील लॅपटॉपवर बसून काम करत असतात. ते गावाकडील शेतात असून मुलगी तिच्या वडिलांना काय स्वयंपाक करायचा असे विचारायला जाते. ते विचारायला गेल्यानंतर तीचे वडील पिठलं भाकरी कर असं सांगतात. यावर ती मुलगी हसून बनवायला जाते. लहान मुलीने शेतीमध्ये स्वयंपाकाचा सेटअप तयार केलेला व्हिडिओमध्ये दिसत असून त्यावरच ती स्वयंपाक करते.
त्यानंतर मुलगी तिच्या बाबांसाठी पिठलं भाकरी बनवायला घेते. तिच्याकडे एक छोटी कढई असते, त्यामध्ये ती पीठ टाकून पिठलं बनवायला सुरुवात करते. त्या छोट्या कढईमध्ये स्वयंपाक करताना बघून मुलगी खूप सुंदर दिसत आहे. त्यामध्येच ती कांदा कापते, त्यानंतर तेल टाकून स्वयंपाक करायला सुरुवात करते. त्यानंतर कढईमध्ये मुलगी पिठलं बनवते.
हे पिठलं बनवल्यानंतर ती मुलगी छोट्या तव्यावर आपल्या बाबांसाठी भाकरी बनवायला लागते. छोट्या तव्यावर मुलगी आपल्या बाबांसाठी भाकर करून मस्तपैकी ताट सजावट. ताटामध्ये पिठलं आणि भाकरी बाजूला दिसून येतात. ताट सजवून मुलगी तिच्या वडिलांना ते ताट वाढते आणि वडीलही खूप छान पिठलं भाकरी झाल्याचे तिला सांगतात.
युझरने काय प्रतिक्रिया दिल्या? -
सोशल मीडिया युझरने यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर बोलताना ही आहे मराठी संस्कृती बाबाची लाडकी लेक, अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. त्यानंतर काही लोकांनी रिल्स वरील सर्वात सुंदर व्हिडीओ असेही म्हटले आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 1,968,689 लाईक्स आल्या असून अनेक कमेंट आल्या आहेत. तसेच युझरने कमेंट केल्या आहेत.
सोशल मीडियावर मुलगी आहे लोकप्रिय -
सोशल मीडियावर ही मुलगी लोकप्रिय असून तिचे इंस्टाग्रामवर नाव मनीषा करंजे असे आहे. तिने बायोमध्ये कॉमेडी, सिंगिंग, नाटक आणि मोटिव्हेशन असे लिहिले आहे. तिने आतापर्यंत 671 पोस्ट टाकल्या असून तिला 5 लाखांच्या वरती फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी ही मुलगी सकारात्मक कंटेंट टाकत असल्यामुळे लवकर लोकप्रिय झाली आहे.
आणखी वाचा -
Loksabha Election 2024 : नितीन गडकरींपासून ते नकुलनाथपर्यंत सर्वांचे भवितव्य मतपेटीत झाले बंद, निकाल कधी कळणार?
नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण जास्त, फूड फार्मरने केले 'हे' गंभीर आरोप