काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोलेंनी केले आहे.
भंडारा येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे विधानसभेची तयारी चालू केली असल्याचे नाना पटोले म्हणाले. मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे, मला इथं यावे लागते. इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. ते प्रश्न सोडवावे लागतात. पण महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचे सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केले आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो.
नाना पटोलेंचा बैठकांचा सपाटा सुरु
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोली विधानसभेत त्यांनी जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. गावात पोहोचल्यानंतर नागरिकांच्याही समस्या नाना पटोलेंनी अगदी आत्मीयतेनं जाणून घेतल्या आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी साकोलीचे नव्हे तर महाराष्ट्रातील 288 जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचे वक्तव्य केले.
शिवसेना ठाकरे गटही स्वबळावर निवडणूक लढवणार?
एका बाजुला काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असतानाच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट देखील आगामी विधानसभा निवडणूक 288 जागांवर लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावरुन महाविकास आघाडीमध्ये काळ तणावाचे वातावरण देखील पाहायला मिळालं होते.
आणखी वाचा :