Nagpur Blast : नागपुरातील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 5 जणांचा जागीच मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

नागपूरमध्ये स्फोटक तयार करणाऱ्या चामुंडा एक्सप्लोसिव्ह या कंपनीमध्ये भीषण अपघात झाला. या स्फोटके तयार कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये स्फोटक तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये भीषण अपघात झाला झाला आहे. चामुंडा एक्सप्लोसिव्ह या स्फोटके तयार कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटत आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तर इतर 5 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्तही हाती आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की लगेच या कंपनीमध्ये आग लागली. त्यानंतर उपस्थितांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे प्रयत्न अपयशी ठरलेत.

नागपूर शहरातील धामणा या परिसरात ही चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटके तयार करणारी कंपनी असून कंपनीमध्ये स्फोटक तयार केली जातात. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप कळू शकलेले नाही.

स्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू, 5 गंभीर जखमी

नागपूर शहरातील धामणा या परिसरात ही चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. आज 13 जूनच्या दुपारच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट झाला त्यावेळी या कंपनीमध्ये 10 ते 12 कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात पाच कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती माहिती पुढे आली आहे. तर मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

अग्निशमन पथकाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

स्फोटात जखमी झालेल्या जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी परिसरात एकच गर्दी केली आहे. अद्याप कंपनीच्या आतमध्ये कुणालाही सोडण्यात आलेले नाही. सध्या अग्निशमन पथकाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक असल्याने ईतर कुणालाही परिसरात जाऊ दिल्या जात नाही आहे. सध्या घटनास्थळी पोलीस आणि संबंधित प्रशासन दाखल झाले असून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात काहीसा तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे.

 

Share this article