Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात 'अब की बार 45 पार', कल्याणमध्येही विक्रमी फरकाने विजय होईल - खासदार श्रीकांत शिंदे

Published : May 02, 2024, 12:39 PM ISTUpdated : May 02, 2024, 12:42 PM IST
MP Shrikant Shinde

सार

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराची घोषणा केली. कल्याण मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाश शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेना गटातील ठाणे-कल्याण मतदारसंघासाठी (Thane-Kalyan Lok Sabha Seat) उमेदवाराच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या जागेवरून ठाण्यात नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि कल्याण येथून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच गुरुवारी (02 मे) उमेदवारी अर्ज भरण्याआधी श्रीकांत शिंदे यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एनआयशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात 'अब की बार 45 पार' असा विश्वास दर्शवला.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
रोड शो दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, "यंदाच्या निवडणुकीतही मोदी सरकार पूर्ण बहुमताने निवडून येईल आणि पीएम नरेंद्र मोदींच पुन्हा पंतप्रधान होतील. आम्ही देशभरात 400 च्या पार जाण्याचे लक्ष ठेवले आहे. यानुसार महाराष्ट्रातही 45 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू. याशिवाय कल्याणमध्येही पुन्हा विक्रमी फरकाने जिंकू."

ठाणे आणि कल्याण जागेवरील उमेदवार
महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातून ठाणे येथून राजन विचारे आणि कल्याण येथून वैशाली दरेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. कल्याण येथून वैशाली शिंदे यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार आहेत.

कोण आहेत श्रीकांत शिंदे?
श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. श्रीकांत शिंदे शिवसेना गटाचे सदस्य आणि 17 व्या लोकसभेत महाराष्ट्रातील कल्याण मतदारसंघातील खासदार आहेत. श्रीकांत शिंदे यांनी डॉ. डी. व्हाय पाटील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि ऑर्थोपेडिक्समध्ये एम.एम.ची डिग्री घेतली आहे. याशिवाय श्रीकांत शिंदे सामाजिक कल्याणासाठी ओखळले जातात.

कोण आहेत नरेश म्हस्के?
नरेश म्हस्के महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठे नेते आहेत. माजी महापौरही राहिले आहेत. वर्ष 2012 मध्ये महापालिकेचे नगरसेवक निवडून आले आणि वर्ष 2017 मध्ये पुन्हा त्यांचा विजय झाला. नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या सदनातील नेत्याच्या रूपातही काम केले आहे. सध्या शिंदे गटातील प्रवक्ते आहेत.

आणखी वाचा : 

मावळ लोकसभा मतदारसंघात सापडले 29 लाखांहून अधिक रुपयांचे घबाड, पोलिसांकडून अधिक तपास सुरू

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का! वरिष्ठ नेत्याने प्रचारसभेसाठी दिला नकार, खरगेंना पत्र लिहून सांगितले हे मोठे कारण

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती